Samruddhi Highway  Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय! वाहन चालकांना थांबवून धडे दिले जाणार; व्हिडिओ आणि...

Precautions to avoid Accidents On Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची कारणे वेगवेगळी आहेत. याची प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे.

माधव सावरगावे

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. १०० दिवसांत या महामार्गावर तब्बल ९०० अपघात झाले असून आत्तापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच समृद्धी महामार्ग अपघातांचा रनवे ठरत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. महामार्गावर होणाऱ्या अपघातांची कारणे वेगवेगळी आहेत. याची प्रशासनानेही गंभीर दखल घेत वाहन चालकांना समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Samruddhi Highway News)

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये सावंगी इंटरचेंज येथे समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक झाली. यामध्ये अतिवेगावर लक्ष ठेऊन अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांना किमान एक ते दोन तास समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.

समृद्धी महामार्गावर १२० कि.मी. प्रतितास वेग मर्यादा देण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहनचालक यापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवितात. ही बाब अपघाताला आमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे अशा वाहनांच्या चालकांचे समुपदेशन करण्याचा पर्याय समोर आला आहे. या समुपदेशनामध्ये वेगवेगळे व्हिडीओ दाखविण्यापासून इतर अनेक माध्यमांचा समावेश राहणार आहे. अपघात घडताना, घडल्यानंतरचे व्हिडीओ दाखविण्यात येणार आहेत.

हे समुपदेशन काही मिनिटांचे नव्हे, तर किमान एक ते दोन तासांचे असावे. आगामी काही दिवसांत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबरोबरच समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉइंटवर स्पीकरद्वारे विविध सूचना देणे, महामार्गावर ठिकठिकाणी संदेशातून जनजागृती करण्यात येणार आहे. (Latest Marathi News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT