Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : मुंबईहून नागपूर फक्त ८ तासांवर, समृद्धी महामार्गाबाबत मोठी अपडेट; कधी येणार सेवेत?

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg: मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठड्यात फिनिशिंगचे काम पूर्ण होईल.

Priya More

समृद्धी महामार्गाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग लवकरच आपल्या सेवेमध्ये येणार आहे. समृद्धी महामार्गाचे शेवटच्या टप्प्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता या महामार्गाचे फक्त फिनिशिंगचे काम बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागपूरवरून मुंबई फक्त ८ तासांमध्ये गाठता येणार आहे. हा महामार्ग पूर्ण क्षमतेने कधी सेवेत येणार याची सर्वजण वाट पाहत होते. अखेर या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२५ मध्ये म्हणजे नव्या वर्षामध्ये समृद्धी महामार्ग आपल्या सेवेत येण्याची शक्यता आहे. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गचा हा टप्पा जानेवारीमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

समृद्धी महामार्गचा शेवटचा टप्पा नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हा १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांचा होईल. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकारक आणि जलद होईल. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किलो मीटर लांबीचा आहे. ७०१ किलो मीटरपैकी ६५२ किलो मीटर लांबीचा मार्ग आतापर्यंत २ टप्प्यात प्रवाशांच्या सेवेत आला आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा बाकी होता. समृद्धी महामार्गचा इगतपुरी-नागपूर-इगतपुरी हा भाग ६ ते ७ तासांत जोडला गेला आहे. आता उर्वरीत टप्प्याचे काम पूर्ण होऊन हा महामार्ग जानेवारी २०२५ मध्ये आपल्या सेवेत येईल.

समृद्धी महामार्गच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत महामार्गचे काम पूर्ण होईल. फिनिशिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर इगतपुरी ते आमणे हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर मुंबईवरून तुम्ही नागपूरचे अंतर अवघ्या ८ तासांत गाठू शकता. महत्वाचे म्हणजे, सध्या इगतपुरी ते भिवंडी हे अंतर पार करण्यसाठी दोन ते अडीच तास लागतात. पण समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर हे अंतर पार करण्यासाठी फक्त ४० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT