Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग आहे तरी कसा? काय आहेत त्याची वैशिष्ट्ये? सविस्तर जाणून घ्या!

राज्याच्या विकासासाठी महत्वाचा महामार्ग ठरणारा समद्धी महामार्ग आहे तरी कसा? काय आहेत त्याची वैशिष्ट्ये ? सविस्तर जाणून घेऊयात.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Samruddhi Mahamarg News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ४ डिसेंबर रोजी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाची पाहणी केली. या संपूर्ण मार्गावर मोटर वाहनाने प्रवास करत त्यांनी मार्गाची पाहणी केली. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महामार्गावर वाहन चालवित होते. राज्याच्या विकासासाठी महत्वाचा महामार्ग ठरणारा समद्धी महामार्ग आहे तरी कसा? काय आहेत त्याची वैशिष्ट्ये ? सविस्तर जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाबाबत व्यक्त केला आहे. ७०१ किलो मीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर (Nagpur) प्रवास हा १७ तासांवरून हे अंतर ७ तासांवर येणार आहे.

देशातील सर्वात मोठा हरित मार्ग असणार आहे, कारण या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी ११ लाख वृक्ष असणार आहे. तर राज्यातील एकूण ३६ टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी ५५,३५५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

राज्यातील १० जिल्ह्यातील, २६ तालुक्यातील ३९१ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. फडणवीस यांचे आमदार असताना नागपूर-मुंबई अंतर कमी करण्याचे स्वप्न होते. प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाल्यावरच ते स्वप्न साकार करता आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पहिल्या टप्प्यांचे लोकार्पण

देवेंद्र फडणवीस यांचे स्वत: या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष देत होते. दर टप्प्याला आणि गतिमान आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जायचा. संपूर्ण राज्यासाठी विकासाचे नवे दालन खुले होणार आहे.

महामार्ग हा सहा पदरी असून मार्ग/150 कि.मी. वेगाने वाहन क्षमता असणार आहे. सध्या नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्ण झाला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येणार आहे. उर्वरित 181 कि.मी. महामार्ग हा पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे.

पर्यटनाला चालना मिळणार

महामार्गाला राज्यातील १४ जिल्हे पोर्टने जोडले जाणार आहेत. प्रतिदिवशी 30 ते 35 हजार वाहने धावणार आहेत. महामार्गामुळे शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता, एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

या मार्गावर 9 ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा/20 इंधन स्टेशन्स रस्त्याच्या लगत असणार आहे. 18 कृषी समृद्धी केंद्रांची या महामार्गाभोवती निर्मिती होणार आहे. या महामार्गाला जोडून दुष्काळी भागात 1000 नवीन शेततळी/चेकडॅम्स उभारले जाणार आहेत.

या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार आहे. सर्वाधिक गतीने पूर्ण भूसंपादन या महामार्गावर झाले. 8800 हेक्टर जागा ही सर्वाधिक गतीने भूसंपादन करण्यात आली. अवघ्या 12 महिन्यात भूसंपादन करण्यात आली. यासाठी 8003.03 कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले.

लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होणार

समृद्धी महामार्ग हा ३ अभयारण्यातून जाणार आहे. काटेपुर्णा (अकोला), कारंजा (वाशीम), तेन्सा (ठाणे). त्यामुळे या भागात प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये यासाठी अंडरपासची देखील सोय करण्यात आली आहे. असे एकूण 209 अंडरपास समृद्धी महामार्गवर आहेत.

ट्राफिक सर्व्हिलन्स, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्री टेलिफोन बुथ प्रत्येक 5 कि.मी. अंतरावर असणार आहे. तसेच या संपूर्ण महामार्गाभोवती आर्थिक गतिविधीमुळे लाखो रोजगार निर्माण होणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात 54 किमीचा मार्ग

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापुर तालुक्यातून जातो. या दरम्यान 2 टोल, 4 फ्लायओव्हर, 05 इंटरचेंज्‍ (सावंगी व शेंद्रा/ जयपुर एमआयडीसी, माळीवाडा, हडसपिंपळगाव व जांबरगांव ) आहेत

जालना जिल्ह्यात 42 किमीचा मार्ग

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जालना जिल्हयाच्या जालना व बदनापूर तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे 42 कि. मी. इतके आहे. टोल प्लाझा / इंटरचेंज 1 असून निधोना, ता. जालना येथे हा टोल प्लाझा / इंटरचेंज आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे 25 गावांतून हा महामार्ग जातो. नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT