Samruddhi Mahamarg Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; खासगी बस कंटेनरला धडकली, 16 प्रवासी जखमी

Samruddhi Mahamarg Bus Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील १६ प्रवासी जखमी झाले.

Satish Daud

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. नागपूर येथून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅव्हल्सने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या घटनेत ट्रॅव्हल्समधील १६ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते.

मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना एकमेकांना जोडण्यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आला. मात्र, या महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. अपघातांच्या घटनांमुळे अनेकजण समृद्धी महामार्गावरून प्रवास करणे टाळत आहेत. दुसरीकडे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

अशातच आज बुधवारी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. नागपूर येथून मुंबईच्या दिशेने सुसाट वेगात येणारी खासगी वैजापूरजवळ कंटेनरला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता की, बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. या घटनेत खासगी बसमधील तब्बल १६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बुलढाण्यात दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना चिखली तालुक्यातल्या वरदडा फाट्यावर मंगळवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास घडली. मृत तरुण हे चिखली तालुक्यातील रहिवासी होते. गोपाल सुरडकर, धनंजय ठेंग, सुनील सोनुने अशी मृतांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT