Samruddhi Mahamarg Accident saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव स्कॉर्पिओ उलटून एक जण ठार

Samruddhi Mahamarg Accident: या थरारक घटनेत स्कॉर्पिओ उलटून एक जण ठार झाला असल्याची माहिती आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

लक्ष्मण सोळुंके

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज सायंकाळी नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. या थरारक घटनेत स्कॉर्पिओ उलटून एक जण ठार झाला असल्याची माहिती आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींनी उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी सायंकाळी नागपूरहुन मुबईच्या दिशेने जात असताना राजेवाडी शिवारात स्कॉर्पिओ अचानक उलटून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरसिंग सवकीलाल सिंग असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील राहिवासी आहे. तसेच वीरेंद्र सिंग आणि राजे सिंग हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी अमरसिंगला तपासून मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरू असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत पोलिसांची आंदोलक शेतकऱ्यांवर दडपशाही, शक्तिपीठ महामार्ग मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

SCROLL FOR NEXT