Samruddhi Mahamarg Accident Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: आम्ही आरडाओरड करत होतो, पण कुणीही थांबत नव्हतं; प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

Bus Accident News: कुणीच मदतीसाठी पुढे आलं नाही, हे धक्कादायक वास्तव प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.

साम टिव्ही ब्युरो

Samruddhi Mahamarg: बुलढाण्यात झालेला अपघात जितका भीषण होता त्याही पेक्षा भयंकर भीषण वास्तव अपघातग्रस्तांनी सांगितलंय. समृद्धी महामार्गावर रात्री बस उलटली. तिचा ब्लास्ट झाला. २६ जण ठार झाले. पण अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी सांगितलेला अनुभव काळजाचा थरकाप उडवणारा आहे. कुणीच मदतीसाठी पुढे आलं नाही, हे धक्कादायक वास्तव प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. (Latest Accident News)

समृद्धी महामार्गाच्या अपघातातून ७ प्रवासी अगदी थोडक्यात वाचले. या प्रवाशांनी धक्कादायक खुलासे केलेत. विदर्भ ट्रॅव्हल्स या बसचा अपघात झाल्यानंतर काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडल्या. कसेबसे बसमधून बाहेर पडले. पण सगळेच प्रवासी या प्रवाशांइतके नशीबवान नव्हते. प्रवासी खिडकी तोडून बाहेर पडले आणि इतक्यात बसचा स्फोट झाला.

वाचलेले प्रवासी येणाऱ्या जाणाऱ्या गाडीतील लोकांना थांबवत होतं. त्याच्याकडे मदतीसाठी याचना करत होते. कुणीतरी मदत करेल या केविलवाण्या अपेक्षेने ते मदत मागत राहिले. पण एकही गाडी त्यांच्या मदतीसाठी थांबली नाही. गाडीचा स्फोट झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी फायर ब्रिगेडची गाडी आली. या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली.

स्थानिक नागरिकांना जेव्हा या स्फोटाचा आवाज आला, तेव्हा त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पण प्रवासी होरपळत होते. स्थानिक नागरिकही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे मदत मागत होते. पण एकही गाडी थांबली नाही. जर येणाऱ्या जाणाऱ्या चालकांपैकी कुणी मदत केली असती तर एवढे लोक गेले नसते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागिरिकांनी दिलीये.

बुलढाण्यात (Buldhana) ज्या बसचा अपघात झाला, त्याचे मालक होते विरेंद्र डारना. २०२० साली ही बस आपण विकत घेतल्याचं त्यांनी सांगितले. ही बस पूर्ण नवीन होती आणि ड्रायव्हरही चांगला अनुभवी असल्याचे डारना म्हणालेत. बसचा टायर फुटला आणि बस डिव्हायडरवर चढली अशी माहिती चालकाने दिली. त्यानंतर बस उलटली आणि त्यातच बसचा स्फोट झाला.

समृद्धी महामार्गावरचा (Samruddhi Mahamarg) हा काय पहिलाच अपघात नाही. जेव्हापासून हा हायवेचे लोकार्पण झालंय, तेव्हापासून ही अपघातांची मालिका सुरुचए. समृद्धी महामार्ग सामान्य प्रवाशांसाठी मृत्यू घेऊन आलाय की काय? गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांच्या मालिकांतून असंच दिसतंय. २६ जणांचा बळी गेल्यानंतर सरकार काही उपाययोजना करणार की असे अपघात होऊन मृतांची संख्या वाढतच जाणारे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT