Samruddhi Mahamarg Accident Samruddhi Mahamarg Accident
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भल्या पहाटे अपघात, कारने घेतला पेट, महिलेचा मृत्यू, २ जण गंभीर

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कार डिव्हायडरला धडकून अपघात झालाय. अपघातानंतर कारने पेट घेतला. कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Namdeo Kumbhar

मनोज जैस्वाल, साम टीव्हीवर प्रतिनिधी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील लोहारा गावच्या हद्दीत ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटून कार डिव्हायडरला धडकून अपघात झालाय. या अपघातात एक महिला ठार झाली. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. कार डिव्हायडरला धडकल्याने कारमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आहे. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

नागपूरवरून मुंबईकडे जात असताना वाशिमच्या कारंजा तालुक्यातील लोहारा गावच्या हद्दीत चायनल क्रमांक 200 मुंबई कॉरिडोरवर ओव्हरटेक करण्याच्या नादात कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट डिव्हायडरला धडकली, धडक देताच कार चालवणारी महिला कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जबरदस्त होती कारमध्ये शॉर्ट सर्किट होऊन कारने लगेच पेट घेतला. हा अपघात पहाटे साडेतीन वाजता घडल्याची माहिती आहे.

लोहारा येथील शेतकऱ्यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांना समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ ही माहिती समृद्धी महामार्ग कारंजा लोकेशन 108 पायलट अतीश चव्हाण यांना दिली. 108 लोकेशन कारंजा पायलट अतिश चव्हाण व डॉ. बी एस राठोड हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दोन्ही जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT