Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News: आधी स्पीड, मग टायर फुटणे... आता 3 महिन्यांच्या अभ्यासानंतर समृद्धीवरील अपघातांचं नवं कारण आलं समोर

Reason Behind Samruddhi Mahamarg Accident: नागपूरच्या विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानमधील (VNIT)ट्रान्सपोर्ट विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी तीन महिने अभ्यास केला.

साम टिव्ही ब्युरो

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सुस्साट झाला आहे. मात्र समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डीदरम्यानचा पहिला टप्पा सुरु झाल्यापासून शेकडो अपघात या मार्गावर झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील वाढणारे अपघात प्रशासनाचा चिंतेची बाब ठरत आहेत. त्यामुळे या अपघातांच्या कारणांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. (Accident News)

सुरुवातीला समृद्धी महामार्गावरील वाहनांचा अतिवेग अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर टायर फुटत असल्याने अपघात होत असल्याचं समोर आलं. आता नवीन कारण समोर आलं आहे.

नागपूरच्या विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानमधील (VNIT)ट्रान्सपोर्ट विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी तीन महिने अभ्यास केला. या अभ्यासातून सर्वाधिक अपघात संमोहनामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे.या विद्यार्थ्यांनी महामार्गावर १०० किमी परिसरात हा अभ्यास केला.

महामार्ग विनाअडथळा सरळ असेल तर तुमची गाडीही एकाच मार्गाने धावते. यामध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूदेखील अॅक्टिव्ह नसतो. या स्थितीला महामार्ग संमोहन असे म्हणतात. अनेक वाहनांचे संमोहनामुळे अपघात होत आहेत. एकूण अपघातापैकी ३३ टक्के अपघात हे महामार्ग संमोहनामुळे झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

Leftover Chapati Recipe : रात्रीच्या चपात्या उरल्या? सकाळी नाश्त्याला बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

EPFO News: पीएफचे पैसे काढण्यासाठी 12 महिने वाट पाहावी लागणार? जाणून घ्या नवीन नियम

SCROLL FOR NEXT