मनोज जयस्वाल, वाशिम, साम टीव्ही
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गावर भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त नागपूरचे रहिवासी असल्याचे कळते. ते शनिशिंगणापूरला देवदर्शनासाठी निघाले होते.
नागपूरमधील भाविक शनिशिंगणापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. आलिशान कारमधून ते समृद्धी महामार्गावरून जात होते. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वानोजा गावच्या हद्दीत महामार्गावर त्यांची भरधाव कार एका धावत्या ट्रकला मागून धडकली. ही धडक इतकी जोरात होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत.
नागपूरमधील भाविक शनिशिंगणापूरला दर्शनासाठी निघाले होते. आलिशान कारमधून समृद्धी महामार्गावरून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात वनोजा गावच्या हद्दीत ते आले. भरधाव कार अनियंत्रित झाली. ती थेट पुढे भरधाव जाणाऱ्या ट्रकवर आदळली. यात कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यात एका भाविकाचा मृत्यू झाला. दोघे जखमी झाले.
शनिशिंगणापूरला देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. आलिशान कार भरधाव होती. समृद्धी महामार्गावर पुढे वेगात जात असलेल्या ट्रकला ही कार मागून धडकली. धडक जोरदार होती. कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. मृत व्यक्तीसह अन्य दोन भाविक हे नागपूरचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावर लोकेशन २०७ वर कार आणि ट्रकमध्ये अपघात झाला. यात एक ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातातील मृत व्यक्ती आणि जखमी झालेले दोघे नागपूरचे रहिवासी असल्याची माहिती समजते. या घटनेची माहिती मिळताच, शेलू बाजार, समृद्धी महामार्ग कारंजा आणि श्री गुरू मंदिर रुग्णावाहिका सेवेचे देशमुख तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यातील एकाला मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.