Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; दोन वेगवेगळ्या अपघातात ५ गंभीर जखमी

सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संजय जाधव

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यापासून या महामार्गावर भिषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत.

आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन वेगवेळ्या अपघातात ५ गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) आज (२७ फेब्रुवारी) सकाळी झालेल्या दोन अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना लोणार तालुक्यातील बिबी व सिंदखेडराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णाल्यात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

वाशीम (Washim) कडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना वाहन चालकाला अचानक झोप लागली आणि त्याने मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला जबर धडक दिली. त्यामुळे गाडी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले.

तर दुसऱ्या अपघातात एक कार वाशिमकडून पुण्याच्या दिशेने जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. यात विलास ढोबळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांच्या पत्नी रुद्रानी ढोबळे वय 30 वर्षे यांचा हात फॅक्चर झाला आहे. कार पलटी झाल्याने अंदाजे तीन ते चार लाखाचे नुकसान झालेअसून जखमींना ग्रामीण रूग्णालय सिंदखेडराजा येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाकडून आत्मसमर्पण; डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरणात बदने नेमकं काय म्हणाले?

BJP Leader Shot : भाजप नेत्यावर दिवसाढवळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या, ५ जण घरात घुसलं अन्...

Ahmednagar Tourism : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला खूप आवडते? मग, अहमदनगरमधील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट

Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT