Samruddhi Mahamarg Saam Digital
महाराष्ट्र

Accident : समृद्धीवर भीषण अपघात, क्रूझरचे टायर फुटले, मग क्रेटाने धडक दिली, २ जणांचा जागीच मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक

Accident on Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर भाविकांच्या भरधाव क्रुझर गाडीचं टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला. त्यातच पाठीमागून येणाऱ्या क्रेटाने जोरदार धडक दिली.

Namdeo Kumbhar

समृद्धी महामार्गावरून शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझरचा भीषण अपघात झाला. क्रूझरला क्रेटाने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालाय. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यामधील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय.

समृद्धी महामार्गावर भाविकांच्या भरधाव क्रुझर गाडीचं टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला. त्यातच पाठीमागून येणाऱ्या क्रेटाने जोरदार धडक दिली. क्रेटाने जोरदार धडक दिल्यामुळे क्रूझर समृद्धी महामार्गावर पलटी झाली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. त्यामधील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिंदखेड राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये विद्या साबळे व मोतीराम बोरकर यांचा समावेश आहे. क्रुझर मधील सर्व भाविक यवतमाळ येथून शिर्डी येथे दर्शनासाठी जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. मुंबई कॉरिडॉर वरील चेनेज ३४४.६ वर सकाळी ८.४५ वाजता अपघात झाला. अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT