Samruddhi Expressway robbery case Beed connection and mastermind arrest saam tv
महाराष्ट्र

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

Samruddhi Expressway Robbery : समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणात बीड कनेक्शन समोर आलं आहे. मुख्य सूत्रधार किरण अजिनाथ गायकवाड याला शिरूर तालुक्यातून अटक करण्यात आली असून धाराशिवमधून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Rohit Kadam

  • समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणात बीड कनेक्शन समोर आलं आहे.

  • पोलिसांनी दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार किरण अजिनाथ गायकवाडला अटक

  • किरण गायकवाडला बीडच्या शिरूर तालुक्यातून जेरबंद

समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणात बीड कनेक्शन समोर आलंय. मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या ‘समृद्धी महामार्गवरून जाणाऱ्यांना धाक दाखवून लुटणाऱ्यांच्या म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किरण अजिनाथ गायकवाड असं या मुख्य सूत्रधाराचं नाव असून त्याला बीडच्या शिरूर तालुक्यातून जेरबंद केलंय. एव्हंढच नाही तर समृद्धी महामार्गावरील चोरी प्रकरणात धाराशिवमधून 6 दरोडेखोरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

अर्जुन व्यकट पवार, वय 55

गोविंद शिवाजी पवार, वय 19

धनाजी अर्जुन पवार, वय 22

अशोक हिरामण शिंदे, वय 37

नितीन हिरामण शिंदे, वय 34

लखन भारत काळे, वय 23

या सर्व दरोडेखोरांनी समृद्धी महामार्गावर प्रवाशांकडून तब्बल 18 लाखांचा ऐवज लुटलाय. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. केवळ सात जणांना अटक करून ही भीती दूर होणार नाही. तर याच्या मुळाशी जाऊन आणखी टोळ्या कार्यरत आहेत का याचा तपास होणं गरजेचं आहे.

मात्र, आता दरोडेखोरांच्या दहशतीनंतर समृद्धी महामार्गावर CCTV बसविण्याकरिता गॅन्ट्री उभारण्याचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालवणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या समृद्धीसह अन्यही महामार्गांवर सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करणं गरजेचं आहे. अन्यथा समृद्धीसारखी लूट दुसऱ्या कुठल्या तरी मार्गावर सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

Navratri Look : गरबा-दांडियासाठी ट्रेंडी आउटफिट्स आयडियाज, पहा बेस्ट पर्याय

Rahul Gandhi : हातात संविधान घेत राहुल गांधींची मोठी घोषणा, उद्या सर्वांना दिल्लीला बोलवलं, कारणही सांगितले

ठाकरे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये; ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT