Samruddhi Mahamarg Accident  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ पुणे-नागपूर लक्झरी बस आणि ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामधील ११ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Namdeo Kumbhar

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Samruddhi Mahamarg Accident News : समृद्धी महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला. मेहकरजवळ खासगी प्रवासी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यांपैकी ११ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की, खासगी बसचा चेंदामेंदा झाला आणि अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडले. जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरील मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याहून नागपूरकडे जाणारी 'बाबा ट्रॅव्हल्स'ची लक्झरी बस समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. अपघातातील गंभीर जखमी झालेल्या ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (किंवा पुढील केंद्रात) संदर्भित (रेफर) करण्यात आले आहे.

इतर जखमी प्रवाशांवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता अधिक असल्यामुळे जे प्रवासी बसमध्ये अडकले होते, त्यांना पोलिसांनी तातडीने बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्याचे काम युद्धपातळीवर केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महामार्गावर मद्यधुंद चालकाचा थरार; कार डिव्हायडर आणि ट्रकला धडकली, चार जण गंभीर जखमी

पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन गावालगत रविवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेतील एका कारचालकाने भरधाव वेगात वाहन चालवत आधी तीन वाहनांना हुलकावणी दिली. त्यानंतर एका वाहनाला धडक देऊन, त्याची कार रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली आणि पुढे जाणाऱ्या एका ट्रकच्या पाठीमागे जोरात धडकली. या अपघातात दुचाकीवरील एका दाम्पत्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने हुलकावणी देण्यास सुरुवात केली होती. एका वाहनाला हुलकावणी दिल्यानंतर ही चारचाकी थेट महामार्गावरील डिव्हायडरवर आदळली आणि समोरील ट्रकवर पाठीमागून आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोग्य विभागात तब्बल 89 लाखांचा घोळ, अधिकाऱ्याच तडकाफडकी निलंबन

Colombia earthquake: 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने कोलंबिया हादरलं; 111 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

Tuesday Horoscope : आनंदाचे वातावरण राहील, ५ राशींच्या व्यक्तीची भरभराट होईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

कुत्र्याच्या हल्ल्यात 150 जण जखमी ; कुत्र्याच्या शोधासाठी पोलीस मैदानात

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातील माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश?

SCROLL FOR NEXT