Sameer Wankhede News Saam TV
महाराष्ट्र

Sameer Wankhede News: अखेर समीर वानखेडेंना दिलासा! आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

Sameer Wankhede Win Case Against Aryan Khan: समिर वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचं कॅटनं म्हटलं आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

Ruchika Jadhav

Sameer Wankhede VS Aryan Khan Case News:

बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थांप्रकरणी तत्कालीन एनसीबीचे झोनल डारेक्टर समीर वानखेडे यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. समिर वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचं कॅटनं म्हटलं आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. (Latest Marathi News)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काही वर्षांपूर्वी अंमली पदार्थांप्रकरणी अटक करण्यात आली होती. कॉर्डेलिया क्रूज शिपवर रेव पार्टी सुरू असताना तेथे अंमली पदार्थ असल्याची टीप वानखेडेंच्या पथकाला मिळालेली. त्यावरून त्यांनी या शिपवर धाड टाकली.

धाड टाकल्यावर अनेक तरुण तरुणी तेथे अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळले. यामध्ये आर्यन खान देखील होता. एनसीबीच्या पथकाकडून पुढे आर्यनवर कारवाई करण्यात आली. काही दिवस त्याला जेलची हवाही खावी लागली.

या प्रकरणी आर्यनला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून २५ कोटींची लाच घेतली होती, असा आरोप करण्यात आलता. यावर मोठी चौकशी झाली. पुढे कॅटकडे तपासाची सूत्रे हलवण्यात आली. अखेर या प्रकरणातून समीर वानखेडे यांनी कोणतीही लाच घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT