Sameer Wankhede: मराठी अधिकाऱ्याला टार्गेट का करता? - नितेश राणेंचा सवाल
Sameer Wankhede: मराठी अधिकाऱ्याला टार्गेट का करता? - नितेश राणेंचा सवाल Saam Tv
महाराष्ट्र

Sameer Wankhede: मराठी अधिकाऱ्याला टार्गेट का करता? - नितेश राणेंचा सवाल

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग: मराठी अधिकाऱ्याला टार्गेट का करता? असा सवाल उपस्थित करत एका हिंदूला स्वतःची जात सिध्द करावी लागते हे उध्दवजींच्या नया महाराष्ट्रात शक्य आहे असा खोचक टोला आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. (Sameer Wankhede: Why do you target Marathi officials? - Question from Nitesh Rane)

हे देखील पहा -

नितेश राणे म्हणाले की, समीर वानखेडे चौकशीला सामोरे गेले, तुमचे अनिल देशमुख चौकशीसाठी गेले का? ते पळून गेले. तुमच्या भावना गवळी चौकशीला सामोरे गेल्या का? मराठी अधिकाऱ्याला टार्गेट का करता? शिवसेना मराठी माणसांची संघटना ना? मला आठवतं काँग्रेसच्या प्रतिभा पाटील या निव्वळ मराठी असल्यामुळे बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. एवढे कडवट बाळासाहेब होते. तो कडवटपणा आजच्या उध्दवजींच्या शिवसेनेमध्ये का नाही?एका हिंदूला स्वतःची जात सिध्द करावी लागते हे उध्दवजींच्या नया महाराष्ट्रात शक्य आहे अशी कडवट टीका त्यांनी केली आहे. सुशांत सिंंह राजपूत प्रकरणी ते म्हणाले की, सुशांतसिंहचा जवळचा मित्र गणेश हिवरकर वारंवार टीव्हीवर सांगत होता. त्याला बाळासाहेब ट्रामा हॉस्पिटलमध्ये एका महाविकास आघाडीतील मंत्री भेटायला गेला आणि त्याला धमकावत होता. हे सगळं संभाषण त्याने मला आणि एका आमदार मित्राला ऐकवलं आहे. त्याचं सगळं संभाषण माझ्याकडे आहे. त्यामुळे प्रभाकर सारखं त्याचंही स्टेटमेंट खर माना. लोकांनी ती ऑडिओ क्लीप ऐकावी असं नितेश राणे म्हणाले.

मी युवा मंत्री म्हणतोय म्हणजे अर्ध्या जनतेला तो कोण मंत्री हे कळलं असेल. प्रभाकर साईलच्या चौकटीत तुम्ही गणेशला बसवाव. संजय राऊत म्हणाले इंटरवल पर्यंत नवाब मलिक त्यानंतर मी संजय राऊत बोलल्यानंतर क्लायमॅक्स नितेश राणे करणार असा इशारा आमदार नितेश राणेंनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

IPL 2024 Playoffs: CSK चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी करावं लागेल हे काम

Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

SCROLL FOR NEXT