जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय - चित्रा वाघ

समीर वानखेडे प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेने नेते संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे.
जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय - चित्रा वाघ
जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय - चित्रा वाघSaam Tv

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेने नेते संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय असा टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला आहे. (janab Sanjay Raut, you want to see Hindustan through the eyes of Nawab Malik said Chitra Wagh)

हे देखील पहा -

चित्रा वाघ म्हणाल्या की, ''जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे. कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाहीये, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाहीये, आरोग्य विभागात घोटाळा होतोय, एमपीएससीच्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जातंय, रोज राज्यातील लहान मुली, महिला यांवर लैंगिक अत्याचार होतायत... या सगळ्या विषयांवरती आपल्याला भाष्य करायचे नाहीये. पण तुम्हाला NCB सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायचं, त्याच्यावर पर्सनल अटॅक करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय - चित्रा वाघ
समीर वानखेडेंच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्विकारला होता, बोगस पद्धतीने नोकरी मिळवली - नवाब मलिक

पुढे त्या म्हणाल्या की, नगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाचा घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करणाऱ्यांचे डोके फोडले जातात आणि तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते यावर तुम्हाला बोलायचं नाही. कारण जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com