Chhagan Bhujbal and Sameer Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: 'सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच', काका-पुतण्या संघर्षावर भुजबळांचा टोला

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राला काका-पुतण्या संघर्षाची परंपराच आहे. ठाकरे, मुंडे, तटकरे, देशमुख घराण्यातील पुतण्याने काकांची साथ सोडली. त्यात आता भुजबळ कुटुंबातून समीर भुजबळांचं नाव जोडलं गेलंय.

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देत नांदगावमधून निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. त्यामुळे महायुतीत छगन भुजबळ टीकेच्या केंद्रस्थानी आलेत. त्यापार्श्वभुमीवर छगन भुजबळांनी पुतणे काकाचं ऐकत नाहीत. या सगळ्या पुतण्यांचा राजकीय डीएनए सारखाच असल्याचा टोला भुजबळांनी लगावलाय. तर यामध्ये भुजबळांनी अजितदादांसह धनंजय मुंडेंचाही उल्लेख केलाय.

महाराष्ट्राला काका पुतण्या संघर्षाची एक परंपरा आहे. त्यातच यंदाच्या विधानसभा निवडणूकीत एकाच घरात वेगवेगळ्या पक्षांचा ट्रेंड सुरुय. मात्र आतापर्यंत कोणत्या पुतण्यांनी काकांपेक्षा वेगळी भूमिका घेतलीय? हे जाणून घेऊ...

राजकारणातला काका-पुतण्या संघर्ष

  • 2007 बाळासाहेब ठाकरेंचा पुतण्या राज ठाकरेंनी शिवसेना सोडली.

  • 2013 मध्ये गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या धनंजय मुंडेंनी काकांना सोडलं.

  • 2019 मध्ये जयदत्त क्षीरसागरांचा पुतण्या संदीप क्षीरसागरांकडून पराभव.

  • 2014 मध्ये अनिल देशमुखांचा पुतण्या आशिष देखमुखांकडून पराभव.

  • 2023 मध्ये शरद पवारांचा पुतण्या अजित पवारांनी काकांची साथ सोडली.

  • 2024 अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार काकांविरोधात मैदानात.

  • 2024 मध्ये राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणेंचं काकाविरोधात बंड.

काका पुतण्या संघर्षात कधी काकाने पुतण्याला तर कधी पुतण्याने काकांना शह दिलाय. मात्र आता छगन भुजबळांचा पुतण्या समीर भुजबळांनी बंडाचं निशाण फडकवत नांदगावमधून लढण्याचं ठरवलंय. त्यामुळे छगन भुजबळांनी समीर भुजबळांना लगावलेला टोला मनापासून आहे की, काका पुतण्यातील ही नुरा कुस्ती आहे? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress vs BJP Clash : नगरमध्ये विखे-थोरात वाद टोकाला; अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, VIDEO

Border Gavaskar Trophy : बॉर्डर-गावस्कर सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा; प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री, तर स्टार खेळाडू बाहेर

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीची फिल्डिंग; वरळीचं राजकीय गणित कसंय? पाहा व्हिडिओ

Congress CEC Meeting: जागावाटपातील वाटाघाटीवर राहुल गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज; CEC बैठकीत सुनावलं

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत शरद पवारच 'चाणक्य'; सत्ता आल्यास कोणाचा मुख्यमंत्री? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT