samda villagers morcha for regular water supply at mgp office in daryapur Saam Digital
महाराष्ट्र

Amravati : सामदा ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा, पाण्यासाठी उपविभागीय अभियंत्यांना घेरले

Water Crisis : आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असताना नागरिकांना व जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील ग्रामस्थांनी आज (गुरुवार) पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यादरम्यान ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांना चांगले धारेवर धरले. यामुळे काही काळ कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाेलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. (Maharashtra News)

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनूसार गेल्या चार वर्षापासून सामदा गावांमध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. यामुळे काम, व्यवसाय साेडून पाणी येण्याची वाट पाहावी लागते. परिणामी घरगुती कामासह अन्य दैनंदिन कामांना दिरंगाई हाेत असते. त्यामुळे आर्थिक नुकसान हाेते. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते.

ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण कार्यालयास वारंवार निवेदन देऊन सुद्धा संबंधित निवेदनाची दखल अधिकाऱ्यांकडून घेतली जात नव्हती असेही ग्रामस्थांनी नमूद केले. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असताना नागरिकांना व जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे आज ग्रामस्थांनी सामूहिक निवेदन देत जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी सामदा येथील ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणात संतप्त झालेल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता यांना महिलांनी चांगले धारेवर धरले. यादरम्यान कार्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी दर्यापूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: श्रीगोंदा मतदारसंघातून विक्रम पाचपुते होणार आमदार? पाहा Exit Poll

Solapur News : मतदानाच्या दिवशी फटाके फोडणे पडले महागात; सोलापुरात सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Ulhasnagar Crime : भयंकर! खेळता खेळता भाचीला धक्का दिला, जीवच गेला, नंतर मामाने नात्याची हद्द पार केली!

Maharashtra Exit Poll 2024 : चंद्रकांत पाटलांना कोथरुडकर पुन्हा आमदार करणार का? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Vasai Exit Poll: वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT