Chhatrapati Sambhajinagar Suresh Borse Death News Saam TV
महाराष्ट्र

Suresh Borse Death : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, संभाजीनगरमध्ये खळबळ

Suresh Borse Death : छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ गावातील जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. वाळू माफियांसोबतच्या वादातून मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

Namdeo Kumbhar

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गावात जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मयत सुरेश बोरसे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस अनिता बोरसे यांचे पती होते. वाळू माफियांच्या अंतर्गत वादात मध्यस्थी करायला गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांच्या मते सुरेश बोरसे यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे, पण बोरसे यांच्या कुटुंबियांकडून वाळू माफियांवर आरोप करण्यात आला आहे.

वाळू माफियासोबतच्या झालेल्या वादातून हृदयरोगविकाराच्या झटक्याने जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याची घटना वेरूळमध्ये घडली. ॲम्बुलन्स मधील मृतदेहासह वेरूळच्या गावकऱ्यांनी रस्त्यावर आंदोलन केले. वेरूळच्या भोसले चौक ते लेणी गेट पर्यंत रस्ता जाम झाला होता.

वाळू माफियाच्या वादात विचारपूस केल्याने शिक्षकाचा खून केल्याचा आरोप गावकरी आणि नातेवाईकांनी केला आहे. वेरूळचा रस्ता गावात अडवला असून, संतप्त गावकरी एकत्र येऊन गुन्हेगारांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाहीत आणि रास्ता रोकोही मागे घेणार नाहीत, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

जिल्हा परिषद शिक्षकाच्या मृत्यूवर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला. वेरूळमध्ये घडलेली घटना भयावह आहे. पोलीस अत्याचार कसा असतो हे दाखवणारा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. ते एक चांगले शिक्षक होते; ज्या भागात ते राहतात त्या भागात गाड्या आल्या, पोलीस आणि वाळू माफियांच्या गाड्या आल्यात. या शिक्षकाने फक्त पोलिसांना विचारले की कुणाकडे आले, एवढे विचारले म्हणून पोलीस आणि माफियांनी मारहाण केल्याचेही दानवे म्हणाले.

या प्रकरणी मुख्यमंत्री आज बोलणार आहेत. मी भूमिका घेतली म्हणून गुन्हा दाखल झाला, पण पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नागरगोजी नावाचा अधिकारी आहे, रेकॉर्डनुसार तो तिथे आले होते, मग अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा कसा दाखल केला जातो? एसपी कुणाला वाचवत आहेत, असा आरोप दानवे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Mumbai: साकीनाका मॅनहोल दुर्घटना; मुंबई महापालिकेचे ४ अधिकारी तडकाफडकी निलंबित

दारू पिऊन गुरूजी झिंगाट, थेट शाळेत येऊन तोऱ्यात बसला! पालकांचा पारा चढला, VIDEO

SCROLL FOR NEXT