Sambhajinagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: सासरच्या छळाला कंटाळली, तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; पोलिसाच्या बायकोच्या आत्महत्येमुळे खळबळ

Sambhajinagar Crime: सासरच्या छळाला कंटाळून पोलिसाच्या बायकोने आत्महत्या केली. संभाजीनगरमधील पोलिस वसाहतीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पोलिसाच्या बायकोने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयातील वसाहतीमध्ये घडली. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सबा समीर शेख (वय २१ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. सबा शेख आय ब्लॉक पोलिस आयुक्तालय वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. तिचे अडीच वर्षांपूर्वी पोलिस कॉन्स्टेबल समीर शेख याच्याशी लग्न झाले होते. समीर शहर पोलिस दलात कार्यरत असून सध्या जीन्सी पोलिस ठाण्यात विशेष शाखेत कार्यरत आहे.

लग्नानंतर समीरने सबाला चांगली वागणूक दिली. पण काही दिवसानंतर छळ करायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून सबा माहेरी गेली होती. मात्र दोन्ही कुटुंबामध्ये मध्यस्थी झाल्यानंतर सबाला सासरी नांदायला पाठवले. त्यानंतर समीर तिच्यावर वेगवेगळी बंधन घालत होता. या त्रासाला सबा कंटाळली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सबाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.

तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे सबा गंभीर जखमी झाली. तिच्या दिराने तिला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान दुपारी ३ वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सबाचा मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. घटनेनंतर सबाचे नातेवाईक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. सबाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी नातेवाईकांनी तात्काळ बेगमपुरा पोलिस ठाणे गाठत सबाचा नवरा आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. या प्रकरणाची पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT