शिळे चिकन खाल्ल्यामुळे १३ जणांना विषबाधा झाल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. यामधील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १२ जणांवर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिळं अन्न खाताना सावधनगिरी बाळगा असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये घडली. शिळे चिकन खाल्ल्यानंतर १३ जणांना विषबाधा झाली. या सर्वांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर १२ जणांची प्रकृती स्थिर आहेत.
पैठण शहरालगत शहागड रोडवरील वीटभट्टीवर हे सर्वजण काम करतात. या सर्वांनी शिळे चिकन खाल्ले होते. चिकन खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब आणि मळमळचा त्रास हऊ लागला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर यामधील ३३ वर्षीय महिलेचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ललिता प्रेमलाल पालविया असे मृत महिलेचे नाव आहे. सर्व मजूर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.