Sambhajinagar Stray Dog Attack News  Saam Tv
महाराष्ट्र

Stray Dog Attack : भटक्या कुत्र्यांची दहशत कधी थांबणार? संभाजीनगरमध्ये चिमुरड्याचे लचके तोडले अन्...

Sambhajinagar Stray Dog Attack News : किरकटवाडीतील सोसायटी पार्किंगमध्ये खेळणाऱ्या चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. राज्यभर वाढलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Alisha Khedekar

  • किरकटवाडी सोसायटीत चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

  • तरुणाच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली

  • राज्यभर वाढलेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती

  • मनपाच्या कारवाईवर प्रश्न; कठोर उपाययोजनांची मागणी

गिरीश निकम, संभाजीनगर

पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. किरकटवाडीमधील चैत्रांगण सोसायटीमधल्या पार्किंगमधला हा धक्कादायक प्रसंग घडला आहे. पार्किंगमध्ये खेळणाऱ्या चार भटक्या कुत्र्यांनी अचानकपणे चिमुरड्यावर हल्ला केला . एक तरुणाने वेळीच धाव घेतल्याने चिमुरडा थोडक्यात बचावलाय.

मुंबई, पुण्यासह बहुतांश शहरांमध्ये कुत्र्यांची दहशत पसरली आहे. वर्ध्याच्या आर्वी मध्ये तर भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. अशातच संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यानं चिमुकल्याचे अक्षरशः लचके तोडलेत. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलावर थेट झडप घेत कुत्र्यानं चावा घेतलाय. यात चिमुकला गंभीर जखमी झालाय.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मग ते पैसे जातात कुठे ? असा सवाल उपस्थित केला जातोय. मनपा प्रशासन भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बिजीकरण करुन त्यांना सोडून देते. मात्र ही कारवाई केवळ कागदावरच असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय.

पिंपरी-चिंचवडमध्येही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न इतका गंभीर आहे की नगरसेवक राजू मिसाळ यांनी प्रतिकात्मक कुत्रा आयुक्त आणि महापौरांना देत प्रशासनावर हल्लाबोल केलाय. सर्वच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.रस्त्यावर फिरणेही अवघड झाल्याने आणखी किती जणांचा बळी गेल्यावर उदासिन प्रशासनाला जाग येणार? राज्य सरकार आता तरी काही कठोर पाऊल उचलणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident: भीषण अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलाखाली कोसळली

Prakash Raj : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं ८६ व्या वर्षी निधन

Maharashtra Live News Update: : जळगाव शहरासह परिसरात अवकाळी पाऊस

Vastu Tips For Water: किचनमध्ये 'या' दिशेला ठेवा पाण्याचे भांडे, रात्रीतून बदलेल तुमचं नशीब

Pune: सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू, चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT