छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. संभाजीनगरच्या वाळुज एमआयडीसी परिसरामध्ये एका शिक्षिकेचा विनयभंग करीत त्यांना आणि त्यांच्या पतीला मारहाण करण्यात आली. याच वाळूज एमआयडीसी परिसरात तीन दिवसांपूर्वी मुलीची छेड का काढतो? म्हणून विचारणा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला गुंड तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.
आता स्कुटी पार्किंगमध्ये लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका महिलेसह चार जणांनी ३७ वर्षीय शिक्षिकेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. तसेच मारहाण करून धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साऊथ सीटी वाळूज सिडको महानगर -2 छत्रपती संभाजीनगर येथील ३७ वर्षीय महिला शिक्षिका तिचा पती, दीर, जाऊ आणि सासू असे सर्वजण रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घरासमोर बसलेले होते. त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या प्रगती जांभुळकर यांच्यासोबत स्कुटी लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. लोकांनी समजावून सांगितल्याने त्यांचे भांडण मिटले होते. परतू नंतर प्रगती जांभुळकरने तिचा नातेवाईक सुनिल जयवालला बोलवून घेतले.
त्यानंतर विकास जांभुळकर, नितीन काळे यांनी शिक्षिकेच्या पती आणि दिराला शिवीगाळ करुन मारहाण केली. शिक्षिका वाद सोडवण्यासाठी गेली असता सुनिल जयवालने हात धरुन, गळ्याजवळ ड्रेस पकडुन ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.
शिक्षिकेला शिवीगाळ करत तू कोणत्या शाळेमध्ये जाँब करते मला माहिती आहे, तुला बघुन घेतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी प्रगती जांभुळकर, विकास जांभुळकर, नितीन काळे, सुनिल जयवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.