Sambhajinagar Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : पाण्यासाठी महिला आक्रमक; म्हाडा कार्यालयावर काढला हंडा मोर्चा

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचा प्रश्न राज्यात गाजला आहे. पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दरम्यान म्हाडा कॉलनीमध्ये मागील चार महिन्यापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसून, कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यात (sambhajinagar) मागील वीस दिवसांपासून परिसरात पाणीच आले नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. या महिलांनी आज (Mhada) म्हाडाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.  (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचा प्रश्न राज्यात गाजला आहे. पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दरम्यान म्हाडा कॉलनीमध्ये मागील चार महिन्यापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसून, कमी दाबाने पाणीपुरवठा (Water Crisis) होत आहे. तर मागील २० दिवसापासून तर पाणीच आलेले नाही. यामुळे पाण्यासाठी या भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तर घरात महिलांना देखील काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर आयुक्त कार्यलयात ठिय्या 

या सर्व परिस्थितीमुळे आक्रमक झालेल्या नागरिक व महिलांनी म्हाडा कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला. याठिकाणी महिलांनी हांडे वाजवत घोषणा देत पाण्यासाठी नारा दिला. दरम्यान जर पाणीपुरवठा सुरळीत नाही केला; तर आम्ही मनपा आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या मांडू असा इशारा यावेळी महिलांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डीत बोगस मतदारांचा आकडा 15 हजारांपर्यंत जाईल - बाळासाहेब थोरात

तुमच्या घरातील किचनसाठी कोणता रंग लकी आहे?

Bhau Beej 2025: संध्याकाळी भाऊबीज करावी की नाही? आजच्या दिवसाचे शुभ मुहूर्त काय

Kolhapur: मध्यरात्री ८ ते १० तरुण गावभर फिरले, नंतर रस्त्याच्या मधोमध केली अघोरी पूजा; धक्कादायक VIDEO समोर

Singer Passes Away: प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT