Sambhajinagar News Bullock Cart Race
Sambhajinagar News Bullock Cart Race Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: बैलगाडा शर्यतीत दोन गट भिडले; दगडफेकीत दोन चिमुकले गंभीर

माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील वासू सायगाव आरापूर शिवारात बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race) आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमध्ये विजयी झालेले व पराभव झालेले दोन गट आमने- सामने (Sambhajinagar) आले. या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यात दोन चिमुकले गंभीर जखमी झाले. (Breaking Marathi News)

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिलेबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वासू सायगाव आरापूर शिवारात ही घटना घडली. यात आयान एजाज सय्यद (वय १२), व अरिहंत त्रिभुवन (वय ६) असे दगडफेकीत जखमी झालेल्या मुलांचे नाव आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील नागपूर- मुंबई राष्ट्रीय महामार्ग लगत वासू सायगाव तारापूर शिवारात असलेल्या गवळीशिवरा याठिकाणी असलेल्या मोकळ्या मैदानात बैलगाडा शर्यतीचे नियमितपणे आयोजन करण्यात येते. या बैलगाडा शर्यतीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. दरम्यान बुधवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असता शर्यतीनंतर विजयी झालेले व पराभूत झालेले दोन्ही गट आमने-सामने आले. 

वाहनावरही दगडफेक 

दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकाला तुफान मारहाण सुरू केली. यावेळी एक चार चाकी वाहन समृद्धी महामार्गावरून वैजापूरकडे जात असताना दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक सुरू होती. यावेळी दगडफेक करणाऱ्यांनी गाडीवर दगडफेक केली. यामध्ये दोन चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. वैजापूर पोलिसांना विचारला असता वैजापूर पोलिसांनी या प्रकरणी काहीच घडली नाही अशी माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : पटेलांनी PM नरेंद्र मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप; नव्या वादाला फुटलं तोडं

Special Story: गॅस भरायला पंपावर गेले आणि एका क्षणात सगळं संपलं! घाटकोपर दुर्घटनेनं नालासोपाऱ्याचं कुटुंब पोरकं केलं

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकं काय आहे प्रकरण?|Ravindra Dhangekar

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड

Varanasi: नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालून शुभेच्छा कुणी दिल्या? Video समोर!

SCROLL FOR NEXT