RTE Admission Saam tv
महाराष्ट्र

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी नोंदणीस टाळाटाळ; ३२ शाळांना नोटीस

sambhajinagar News : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागावर आजवर प्रवेश देण्यात येत होता.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : आरटीई प्रवेशासाठीची प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सुरू करण्यात आली आहे. या करीता (School) शाळा नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र वारंवार सूचना देऊनही (Sambhajinagar) अद्याप नोंदणी न करणाऱ्या ३२ शाळांना शिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. (Latest Marathi News)

आर्थिक दुर्बल घटकातील (Student) विद्यार्थ्यांना शिक्षण कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागावर आजवर प्रवेश देण्यात येत होता. मात्र यामध्ये यंदा बदल करण्यात आला असून पालकांना अनुदानित शाळा ऐवजी त्यांच्या परिसरातील (Zilha Parishad) जिल्हा परिषद, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत मुलाला प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना घेता येणार आहे. या (RTE) प्रक्रियेला ५ एप्रिलपासून सुरवात करण्यात आली आहे. अर्थात पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रवेशाबाबत वारंवार सूचना देऊन देखील काही शाळा प्रवेशासाठी टाळाटाळ करत असतात. संभाजीनगर जिल्ह्यातील अशा ३२ शाळांना नोटीस बजावण्यात आली आहे. या शाळांनी नोंदणी केली नसल्याने त्या शाळांची मान्यता रद्द करण्याबरोबरच त्या शाळांना आरटीईचा शासनाद्वारे दिला जाणारा परतावा थांबविण्यात येईल; अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी ही नोटीस देत शाळांची कानउघडनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! येत्या गुरुवार पासून पुणे शहरात १० टक्के पाणी कपात

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

SCROLL FOR NEXT