रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये उपचारादरम्यान मुलीचा (Death) मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यसंस्कार करून परत आलेल्या बापाने गळफास घेत आत्महत्या केल्याची (Sambhajinagar) धक्कादायक घटना उघडकीस आली. बाप लेकीचा एकापाठोपाठ मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)
सोयगाव नगरपंचायतमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी असलेल्या दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी कुठलीच सूचना न देता नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी निलंबित केले होते. तसेच त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते. त्यातच दीपक राऊत यांच्या १९ वर्षीय मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्याने ७ एप्रिलला मृत्यू झाला होता. यामुळे दीपक राऊत याना वाईट वाटत होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्याने तसेच योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्यामुळे दीपक राऊत यांना मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्ययसंस्कार केल्यानंतर रात्री २ वाजता घरात गळपास घेऊन आत्महत्या केली. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावेळी कुटूंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचा मृतदेह नागरपंचायतसमोर आणून ठेवला आहे. जोपर्यत न्याय मिळत नाही आणि संबंधित नगरपंचायत मुख्यधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यत दीपक राऊत यांचा मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.