Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा; भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची केली मागणी

Sambhajinagar News : जात प्रमाणपत्र शासन दरबारी मिळण्यास अडचणी येत असल्याने महाराष्ट्र शासनाने जारी केलेली पोलीस भरती प्रक्रिया एमपीएस्सी परीक्षे प्रमाणे पुढे ढकलण्यात यावी

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या काही मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी (Police) पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडून पोलीस अधीक्षकांना मागण्यांचे निवेदन दिले. (Breaking Marathi News)

राज्य शासनाने पोलीस भरती संदर्भात मार्च २०२३ च्या वयवाढी संदर्भात काढलेल्या जी आरची वैधता मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात यावी. तसेच एसइबीसी जात प्रमाणपत्र शासन दरबारी मिळण्यास अडचणी येत असल्याने महाराष्ट्र शासनाने जारी केलेली पोलीस भरती प्रक्रिया एमपीएस्सी (MPSC) परीक्षे प्रमाणे पुढे ढकलण्यात यावी; या मागणीसाठी मोर्चा काढत या मागण्यांचे निवेदन आज (Student) विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजातील काही मुलांनी वयोमर्यादा ओलांडली, तर काही मुलांना कागदपत्रे काढण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने विलंब होत आहे. त्यासाठी हे विद्यार्थी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एकत्र आले होते. मोर्चा काढत सर्व विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT