Farmer Rasta Roko Saam tv
महाराष्ट्र

Farmer Rasta Roko : पैठण- संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; ओला दुष्काळ जाहिर करत सरसकट मोबदला देण्याची मागणी

Sambhajinagar News : मुसळधार पावसात शेत जमिनी खरडून गेल्या असून पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. तर शासनाने तुटपुंजी आर्थिक मदत दिल्याने शासनाविरुद्ध शेतकऱ्यांचा रोष असून आंदोलन छेडले आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : मुसळधार पावसात शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तर पैठण तालुक्यातील सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने आज पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील बिडकीन येथील निलजगाव फाटा येथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मंत्र्यांचा निषेध देखील करण्यात आला. 

राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असल्याने शेतांमध्ये पाणी साचून असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अर्थात शेतातून येणारे उत्पन्न शून्य झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर सरकारकडून अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. 

मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी 

शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करत फोटोशूट करणारे मंत्र्याचे खाली मुंडके वर पाय असे प्रकारचे अशा प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी या आंदोलनात बिडकीन व परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट मदत करा, मंत्र्यांनी शेतकऱ्यांना फसवणूक करु नये, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला द्यावा; अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्ते बाप्पासाहेब आम्ले यांनी केले आहे.

नांदेडमध्येही रास्तारोको 

नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टर अधिक शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. नांदेड ते हैदराबाद महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. तर नांदेडच्या लोहा तालुक्यातील मारतळा येथे शेतकऱ्याचे रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

स्पेसक्राफ्ट एका दिवसात किती फेऱ्या मारतं?

Crime News: बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, ३ अल्पवयीन मुलांना अटक; चोरीस गेलेल्या वस्तू जप्त

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले शिंदेंचे आमदार, लाखोंची प्रॉपर्टी विकून केली मदत; पाहा VIDEO

नवी मुंबईत स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; ६ हजारासाठी तरूणींवर दबाव, पोलिसांकडून पर्दाफाश

SCROLL FOR NEXT