Paithan News Saam tv
महाराष्ट्र

Paithan News : पैठणवरुन KBC पर्यंत कसे पोहोचले, १ कोटीचा प्रश्न का सोडला, ५० लाख जिंकलेल्या शेतकऱ्याची कहाणी

Sambhajinagar News : पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक गावातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड यांना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. प्रश्नांची अचूक उत्तर देत १ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहचले होते

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : कौन बनेगा करोडपती या टीव्ही शो मध्ये अनेकांनी मोठी रक्कम जिंकत करोडपती झाले आहेत. अशात यंदाच्या सीझनमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक गावातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड यांनी KBC शोमध्ये १ कोटी रुपयांचा प्रश्न सोडला आणि ५० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. 

कौन बनेगा करोडपतीचा १७ वा सीझन सध्या सुरु आहे. या शोच्या आतापर्यंत झालेल्या सीझनमध्ये अनेकजण करोडपती झाले आहेत. तर अनेकांनी लाखो रुपयांची रक्कम जिंकली आहे. याच शोच्या यंदाच्या सिझनमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक गावातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड यांना हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. त्यांनी एक- एक प्रश्नांची अचूक उत्तर देत १ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहचले होते.  

शेतकरी कैलास कुंटेवाड यांच्याकडे केवळ दोन एकर कोरडवाहू शेती असून यातून मिळणारे उत्पन्न हेच त्यांच्या कुटुंबाचे मुख्य आधार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण थांबलं. पण शिकण्याची ओढ मात्र कायम राहिली. त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर यूट्यूब आणि पुस्तकांच्या माध्यमातून सामान्य ज्ञान वाढवलं आणि केबीसीमध्ये जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. 

तिसरा प्रयत्न आणि ५० लाखाचे बक्षीस 

'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी होण्याचा कैलास यांनी तीन वेळा प्रयत्न केला. पहिल्या दोन वेळेस अपयश आलं, पण खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हॉटसीटपर्यंतची मजल मारली. यात कैलास कुंटेवाड यांनी १४ प्रश्नांची अचूक उत्तरं देत ५० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. यानंतर १५ व प्रश्न १ कोटी रुपयांसाठी होता. मात्र लाईफलाईन घेतल्यानंतर देखील या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नसल्याने त्यांनी गेम क्वीट करत ५० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा उशिराने सुरु

Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Kidnapping : निर्जन रस्ता, मिट्ट काळोख, ट्रक रिव्हर्स घेतला; ड्रायव्हरनं महिलेला उचललं अन्..; अपहरणाचा थरारक Video

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का; आणखी एका राजकीय घराण्यात फूट; आमदार पुत्र भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

Nashik Police Transfers: नाशिकचा क्राइम रेट वाढला, पोलीस अधिकाऱ्यांना थेट झटका; डझनभर पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT