Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; २० गावांचा संपर्क तुटला

sambhajinagar Paithan News : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजविण्यास सुरवात केली आहे. यात संभाजीनगर, परभणी, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात देखील पावसाने झोडपून काढले आहे. यात तालुक्यातील लोहगाव परिसरात रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने पाझर तलाव फुटल्याने तोंडोळी रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मावसगव्हाणकडे जाणारा मार्ग बंद पडला आहे. तब्बल २० गावांचा संपर्क तुटला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामध्ये लोहगावात १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यातील मावसगव्हान, लामगव्हान, ब्रम्हगव्हान, वाड्या वस्तीवरील जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच डांगे वस्तीवरील घरांमध्ये पाणी शिरले असून शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले आहे. कातपूरजवळ नदीला आलेल्या पुरामुळे बालानगर- पैठण- वरुडी मार्गावरील रस्ता बंद करण्यात आला असून प्रशासनाने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

जिंतूर तालुक्यातील दोन मंडळांमध्ये मुसळधार पाऊस
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी आणि दुधगाव या दोन मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जवळपास तीन तास पाऊस पडत असल्यामुळे जिंतूर तालुक्यातील या दोन्ही मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच करवली, पिंपरी, रोहीला, बोरवाडी, कसर या गावांतील काही घरांमध्ये पाणी शिरले असून संसारउपयोगी साहित्य अन्नधान्याचे नुकसान झाले. तसेच करवली गावातील मारोती मंदीरातही पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे या गावांच्या परिसरातील ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.

पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवले
हिंगोली : हिंगोलीच्या इसापूर रमणा गावात ओढ्याला आलेल्या पुरात शेतकरी वाहून जात असताना एका तरुणाने जीवाची बाजी लाऊन प्राण वाचवले आहेत. आनंदा खंदारे असे वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे नावआहे.  पुरातून बाहेर काढत या शेतकऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीचे नाव मनोज राठोड असे आहे. दरम्यान पुरात वाहून जाताना या शेतकऱ्याचा व्हिडिओ गावकऱ्यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा थरार पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT