Nath Sagar Dam Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : नाथ सागर धरणात केवळ १० टक्केच पाणीसाठा; कालवा फुटल्याने पाण्याची नासाडी

Sambhajinagar News : राज्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने धरणात असलेल्या पाण्याची पातळी देखील खालावत आहे. हीच परिस्थिती नाथसागर धरणाची झाली आहे. आता धरणात १० टक्केच पाणी साठा

Rajesh Sonwane

रामू ढाकणे  

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या नाथसागर धरणाच्या पाण्याची परिस्थिती आता चिंताजनक झाली आहे. (Sambhajinagar) या धरणात आता केवळ दहा टक्केच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. असे असतानाच उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. अर्थात दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याची नासाडी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Live Marathi News)

राज्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा पाऊस (Rain) कमी झाल्याने धरणात असलेल्या पाण्याची पातळी देखील खालावत आहे. हीच परिस्थिती नाथसागर धरणाची झाली आहे. आता धरणात १० टक्केच पाणी साठा (Paithan) राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असे असताना तळणेवाडी परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती नसलेला उजवा कालवा फुटला आणि यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचही पहायला मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या एक महिन्यापासून पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्याची पातळी अत्यंत चिंताजनक बनली असून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेती सिंचनासाठी काही महिन्यापासून पाण्याचा विसर्ग पाणी करार आदेशानुसार सुरू ठेवला. मात्र भर उन्हाळ्यात जिल्ह्यात प्रचंड पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असूनही लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचे  पाहायला मिळालं. दरम्यान नाथसागर धरणातून सोडण्यात येणारे पाणी दररोज छत्रपती संभाजी नगर उरुळी पाईपलाईन फुटून नासाडी होत असतानाच दुसरीकडे हा कालवा फुटल्यामुळे भर उन्हाळ्यात दुष्काळात तेरावा महिन्यात म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली.

हंडाभर पाण्यासाठी खोल दरीत पायपीट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या सावखेडा गावातील नागरिकांनी धरणातील पाणी गढूळ, गाळयुक्त आणि दूषित असल्याचा आरोप करीत हे पाणी पिण्यास नकार दिला. त्यामुळे आजघडीला या गावात प्रचंड प्रमाणात पाणीबाणी निर्माण झाली असून ग्रामस्थांना अजिंठा पर्वतरांगेतील रान वाटेने मार्गक्रमण करून २०० फूट दरीत उतरून पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन फिरावं लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT