Maharashtra Politics 2024 : आईच्या विजयासाठी लेक मैदानात ! रेवती सुळे आईसाठी बारामतीच्या प्रचारात

Lok Sabha Election 2024 : रेवती सुळेही आईच्या प्रचारासाठी बारामतीच्या प्रचारात सहभागी झाल्या आहेत. आईसाठी लेक प्रचाराच्या मैदानात उतलीय. सुप्रिया सुळेंच्या प्रचार रॅलीमध्ये रेवती सुळेंनी सहभाग घेतलाय.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

बारामतीची लढत पवार विरूद्ध पवार अशी असल्यामुळे पवार कुटूंबातले सर्वच सदस्य प्रचाराच्या मैदानात उतरलेत. सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार आईच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. अशातच रेवती सुळेही आईच्या प्रचारासाठी बारामतीच्या प्रचारात सहभागी झाल्या आहेत. आईसाठी लेक प्रचाराच्या मैदानात उतलीय. सुप्रिया सुळेंच्या प्रचार रॅलीमध्ये रेवती सुळेंनी सहभाग घेतलाय. बारामती शहरातील खाटीक गल्ली, म्हाडा कॉलनी परिसरात सुप्रिया सुळेंसाठी प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेही उपस्थित होत्या.यापूर्वी रेवती सुळे कोणत्याही राजकीय व्यासपीठावर दिसल्या नव्हत्या. मात्र यंदा पवार कुटुंबाताली इतर सदस्यांसोबत आता रेवती सुळे सुद्धा आई सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत, पाहुयात हा रिपोर्ट..

बारामतीची लढत पवार विरूद्ध पवार अशी असल्यामुळे पवार कुटूंबातले सर्वच सदस्य प्रचाराच्या मैदानात उतरलेत. सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार आईच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. अशातच रेवती सुळेही आईच्या प्रचारासाठी बारामतीच्या प्रचारात सहभागी झाल्या आहेत.

महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवारी लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांच्या कुटुंबीयांकडून आपापल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या रेवती सुळे यांनीही प्रचारात सहभाग घेतला.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : भुमरेंच्या कुटुंबाला दारुचं लायसन्स; पत्नीच्या नावानं दारु विक्रीचे दोन परवाने

अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंच्या साथीला आहेत.. युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळे यांनीही आईसाठी पदयात्रा काढली. आईच्या प्रचारासाठी लेक पहिल्यांदाच मैदानात उतरल्याने सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळे उच्चशिक्षित आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून रेवतीने मास्टर पूर्ण केलंय. वडील सदानंद सुळे यांच्याप्रमाणेच रेवती सुळेही राजकीय कार्यक्रमांपासून अंतर ठेवून असतात.

मात्र यावेळी पवार विरुद्ध पवार अशी लढत असल्यामुळे रेवती सुळेदेखील प्रचाराच्या मैदानात आहेत. बारामतीच्या मैदानात प्रत्येक पवाराची स्वत:ची ओळख आहे. रेवती सुळेंनीही प्रचाराच्या निमित्ताने राजकारणात पहिलं पाऊल टाकलंय. आता रेवती सुळेंचा प्रवास आईसारखाच दिल्लीपर्यंत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Election: शिरूरमधून भुजबळांना उमेदवारी देण्याचा होता प्लॅन; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com