Sambhajinagar Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident: रस्ता ओलांडताना स्कूलबसची धडक, दुचाकीस्वाराला २० फूटापर्यंत फरफटत नेले; भयानक CCTV

Sambhajinagar Bike And School Bus Accident: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केऱ्हाळा फाट्याजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

Priya More

रामू ढाकणे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची (Sambhajinagar Accident) घटना घडली आहे. स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. केऱ्हाळा फाट्याजवळ ही घटना घडली आहे. अपघातानंतर स्कूल बसने दुचाकीस्वाराला १५ ते २० फूटापर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पळून गेला. या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केऱ्हाळा फाट्याजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. स्कूल बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी पाठीमागच्या दिशेने आलेल्या भरधाव स्कूल बसने दुचाकी स्वराला जोराची धडक दिली. दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर चालकाने बस थांबवली नाही तर तशीच पुढे घेऊन गेला.

दुचाकीस्वाराला स्कूल बसने १५ ते २० फुटापर्यंत फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता ही यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चालकाने स्कूल बससह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची नोंद बाजार पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी स्कूल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर देखील अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेंपोने साखर वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली. पहाटेच्या सुमारास मुंबई लेनवर झालेल्या या अपघातानंतर टेम्पोने पेट घेतला या अपघातात एकाचा होरपळून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT