Yuvraj Singh: वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेत्या खेळाडूंना तो व्हिडिओ शेअर करणं भोवलं! प्रकरण थेट पोलिस स्थानकात- VIDEO

Complaint Files Against Yuvraj Singh And Harbhajan Singh:भारतीय संघातील माजी खेळाडू हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
Yuvraj Singh: वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेत्या खेळाडूंना तो व्हिडिओ शेअर करणं भोवलं! प्रकरण थेट पोलिस स्थानकात- VIDEO
team indiatwitter
Published On

भारतीय संघाचे माजी खेळाडू युवराज सिंग, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांचा एक व्हिडिओ सध्या वादाचं कारण ठरतोय. या तिन्ही खेळाडूंनी इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स या स्पर्धेत विजय मिळवला. या विजयानंतर विजयाचा जल्लोष म्हणून एक बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ झटक्यात व्हायरल झाला. मात्र वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या मानसी जोशीने हा व्हिडिओ असंवेदनशिल आणि दिव्यांगाची थट्टा उडवणारा असल्याचं म्हटलं. हा व्हिडिओ करण्यात आला असला, खेळाडूंनी माफी मागीतली असली तरीदेखील तिन्ही खेळांडूविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करणं या तिन्ही क्रिकेटपटूंना भलतच महागात पडलं आहे. हरभजन सिंगने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात हरभजन सिंगसह युवराज सिंग आणि सुरेश रैना असल्याचं दिसून येत आहे. हे तिन्ही खेळाडू लंगडत चालताना दिसून येत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला त्याने विक्की कौशलचं 'हुस्न तेरा तोबा तोबा' हे गाणं लावलं आहे.

Yuvraj Singh: वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेत्या खेळाडूंना तो व्हिडिओ शेअर करणं भोवलं! प्रकरण थेट पोलिस स्थानकात- VIDEO
Team India Captain: शुभमन गिलने हार्दिक पंड्याचं टेन्शन वाढवलं!कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार?

या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने,' लेजेंड क्रिकेटच्या १५ दिवसात शरीराचं तौबा तौबा झालं. शरीराचा एकूण एक भाग दुखतोय..' असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स ही स्पर्धा झाल्यानंतर शेअर करण्यात आला आहे. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केलं होतं.

Yuvraj Singh: वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेत्या खेळाडूंना तो व्हिडिओ शेअर करणं भोवलं! प्रकरण थेट पोलिस स्थानकात- VIDEO
Team India Coach: बॉलिंग कोच म्हणून गौतम गंभीरने दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गजाचं सुचवलं नाव; वाचा आहे तरी कोण?

हा व्हिडिओ व्हायरल होताच, पॅरा वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू मानसी जोशीने नाराजी व्यक्त केली होती. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने लिहिले होते की, 'तुमच्या सारख्या क्रिकेटपटूंकडून अपेक्षा ठेवल्या जातात. कृपया करुन दिव्यांगांची थट्टा करु नका. हा मस्करीचा भाग नाही.

हरभजन सिंगनेही पोस्ट शेअर करत माफी मागितली होती. दरम्यान दिल्ली पोलिसांनी हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैनाविरोधात तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसएबल्ड पीपल या एनजीओकडून नोंदवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com