Marathwada Water Shortage Marathwada Water Shortage
महाराष्ट्र

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात ४९७ गावे, १५० वाडावस्ती तहानले; ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Sambhajinagar News : यंदा पाऊस कमी आणि उन्हाची तीव्रता अधिक अशी स्थिती आहे. यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील बहुतांश टंचाईची समस्या गडद झाली असून पुढील दोन महिन्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : वाढत्या तापमानासोबतच मराठवाड्यात आता पाणी टंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. (Water Crisis) त्यामुळे मराठवाड्यातील तब्बल ४७० गावे आणि ११५ वाड्यातील गावकरी आता टँकरच्या पाण्यावर तहान भागवू लागल्याचे चित्र आहे. सध्या या गावांमध्ये ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा (Sambhajinagar) केला जात असून पुढील काळात पाणी प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

यंदा पाऊस (Rain) कमी आणि उन्हाची तीव्रता अधिक अशी स्थिती आहे. यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील बहुतांश भागात टंचाईची समस्या गडद झाली असून पुढील दोन महिन्यात टंचाईच्या (Water Scarcity) झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्यात टंचाईचे प्रमाण अधिक वाढत आहे. दरम्यान ऐन उन्हाळ्यातच निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे मते मागण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांची पाणी प्रश्नावर उत्तर देताना दमछाक होण्याची शक्यता आहे. दरम्यान जलजीवन मिशनद्वारे (Marathwada) मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणी प्रश्न कायम सोडवण्याचा प्रयत्न आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टँकरसाठी ३६१ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून टंचाईग्रस्त गावांमध्ये ७४८ विहिरीवरून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीला आठही जिल्ह्यामधून ५ हजार ५२३ पाणीपुरवठा योजना मंजुरी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ १ हजार २९८ योजना पूर्ण झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT