Lok Sabha Election: निवडणूकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची वणवण, आचारसंहितेमुळे खतांचा तुटवडा; अमोल कोल्हेंचा आरोप

Pune Farmers Not Getting Fertilizer: ऐन निवडणूकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची वणवण होत असल्याचं समोर आलं आहे. आचारसंहितेमुळे खतांचा तुटवडा जाणवत आहे.
अमोल कोल्हे
Amol KolheSaam Tv

रोहिदास गाडगे साम टीव्ही, पुणे

Code Of Conduct Lok Sabha Election 2024

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांची (Farmers) मोठी वणवण होत आहे. शेतकरी सध्या खत मिळत नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत. दुकानाबाहेर शेतकऱ्यांनी युरीया खत खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसत (Farmers Not Getting Fertilizer) आहे. या निवडणूकीचा फटका खताच्या तुटवड्यामुळे शेतातील पिकांना बसत असल्याचं चित्र आहे. (latest politics news)

उत्तर पुणे (Pune) जिल्ह्यात अचानक युरीया खताचा तुटवडा झालाय. या तुटवड्याचं कारण निवडणूकीची आचारसंहिता आहे, असा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला (Amol Kolhe Claim) आहे. युरियाच्या बॅगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे नव्याने बॅग उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी, खतांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिक खतांच्या दुकानाबाहेर उन्हाच्या तडाख्यात रांगा लावुन उभे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदींचा फोटो असलेल्या खतांच्या बॅगची विक्री सध्या थांबवण्यात आली आहे. या खतांच्या बॅगची विक्री केल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप केला जात होता. आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही पक्षाचं चिन्ह, (Code Of Conduct Lok Sabha Election 2024) कोणत्याही राजकीय नेत्यांचे फोटो किंवा सरकारच्या योजनांची जाहिरात देखील केली जात नाही. आता खतांच्या बॅगमुळे भाजपचा प्रचार होत असल्याचं काहींनी म्हटलं होतं. तेव्हापासून निवडणूका पार पडेपर्यंत या खताची विक्री थांबविण्यात आली आहे.

आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची वणवण होत असल्याचं समोर आलं आहे. आचारसंहितेमुळे खतांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आता निवडणूकांचा फटका शेतपिकांना बसणार का? असा सवाल आता उपस्थित होत (Lok Sabha Election 2024) आहे. आचारसंहिता असल्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळत नाहीये, त्यामुळे शेतपिकांचं नुकसान होत असल्याचं समोर येत आहे.

वाशिममधील घटना

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू (Code Of Conduct) झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या डीएपी आणि युरिया खतांच्या बॅगची विक्री केली (Lok Sabha 2024) जात होती. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे, अशी तक्रार समनक जनता पार्टीकडून करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com