Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : कुलर बनवणाऱ्या कंपनीत बनावट दारूचा कारखाना; छापा टाकत २ लाखाचा मुद्देमाल जप्त

Sambhajinagar News : संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात असलेल्या कोहिनूर इंडस्ट्रीज मधील कुलर बनवणाऱ्या कंपनीत बनावट दारू विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून साठवून ठेवली असल्याची माहिती मिळाली होती

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसीत कुलर बनवणाऱ्या कंपनीत बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचे समोर आले आहे. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत सदरचा कारखाना उध्वस्त केला आहे. तसेच या ठिकाणाहून तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

आगामी उन्हाळा लक्षात घेता डेझर्ट कुलर बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. यात एमआयडीसी परिसरात कुलर बनविण्याचे मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. मात्र या कारखान्याच्या आडून अवैधपणे बनावट दारूचा कारखाना चालविण्यात येत होता. दरम्यान छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबत माहिती मिळाली होती. याची पूर्णपणे शहानिशा करून पथकाने छापा टाकला. 

माहिती मिळताच टाकला छापा 

संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात असलेल्या कोहिनूर इंडस्ट्रीज मधील कुलर बनवणाऱ्या कंपनीत बनावट दारू विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून साठवून ठेवली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता याठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साथ आढळून आला. अर्थात बाहेर कुलर बनविण्याचे काम सुरु असताना मागे हा साठा करून ठेवण्यात आला होता. 

मुद्देमाल हस्तगत करत चार जण ताब्यात 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला याठिकाणी १ लाख ९० हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल त्या ठिकाणी आढळून आला. तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तो मुद्देमाल जप्त करत त्यांची विक्री करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये कुंदन बोबडे, आकाश जाधव, अशपाक काजी आणि शरीफ शेख अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. आता या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT