Grishneshwar Temple Saam tv
महाराष्ट्र

Grishneshwar Temple : तात्काळ दर्शनासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये; घृष्णेश्वर येथील धक्कादायक प्रकार, पाच जणांवर गुन्हा दाखल

Sambhajinagar News : दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांना गाठून त्यांना दर्शन रांगे ऐवजी तात्काळ दर्शन घडवून देण्याचे सांगत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. असाच प्रकार घृष्णेश्वर येथे समोर आला आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : श्रावण मासानिमित्ताने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सर्वच मंदिरांवर गर्दी होत आहे. यात बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वराचे तत्काळ दर्शन करून देण्याचे सांगत प्रतिव्यक्ती १०० रुपये वसूल केल्याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले पाचही आरोपी हे रिक्षा चालक असल्याची माहिती समोर आली आहे. 

पंजाब राज्यातील जेगराऊ येथील राकेशकुमार श्रीदेशराज गुप्ता यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत तक्रार दिली आहे. श्रावण महिना असल्याने महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. यात बारा ज्योर्तीलिंगाच्या स्थळांवर दूरवरून भाविक येत आहेत. मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार श्री घृष्णेश्वर येथे समोर आला आहे.    

पैसे घेत भाविकांची फसवणूक 

यात राकेशकुमार गुप्ता हे घृष्णेश्वर येथे दर्शनासाठी आले असताना त्यांना देखील पैशांची मागणी करण्यात आली. त्यानुसार गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घृष्णेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी आले असताना पाच आरोपींनी तात्काळ दर्शन करून देतो, असे सांगून प्रतिव्यक्ती १०० रुपयांप्रमाणे पैसे घेतले. मात्र, दर्शन करून न देता त्याच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन फसवणूक केली.

पाच रिक्षा चालकांवर गुन्हा 

दरम्यान दर्शन करून देण्याच्या नावाने पैसे घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी शेख सिकंदर शेख सांडू, समत खान बाबू खान, सरवर शेख अन्वर शेख, शांतीलाल अशोक ढिवरे, सय्यद इम्रान सय्यद बाबर या पाच रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

Pigeon Shelters: हायकोर्टाचा आदेश धुडकावून मुंबईत टेरेसवर कबुतरखाने

SCROLL FOR NEXT