Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: चहा पिताना वाद; कॅनॉट प्लेस परिसरात टोळक्याची फ्री स्टाईल

चहा पिताना वाद; कॅनॉट प्लेस परिसरात टोळक्याची फ्री स्टाईल

साम टिव्ही ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : चहा पीत असलेल्या तरुणांच्या दोन गटात रस्त्यावरच हाणामारी झाल्याचा (Sambhajinagar) प्रकार कॅनॉट प्लेस परिसरात घडला. या राड्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. मात्र या प्रकाराने शहरातील सर्वात गजबजलेला कॅनॉट परिसर पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. (Breaking Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगरातील कॅनॉट प्लेस हा पिकनिक स्पॉट झाल्यासारखा गजबजून जात असतो. दरम्‍यान रविवारी (२५ जून) साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास तरुणांचे एक टोळके चहाच्या दुकानावर चहा पीत होते. दुसरा एक पाच सहा जणांचा गट तिथे दाखल झाला. किरकोळ कारणावरून त्यांच्यात कुरबुर सुरू झाली आणि पाहता पाहता हे दोन्ही गट एकमेकाला भिडले. प्रचंड आरडा ओरड आणि शिवीगाळ सुरू झाली. दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले.

चार जणांवर गुन्‍हा दाखल

या झोंबा झोम्बीत अनेक तरुणांचे शर्टही फाटले. तर या लोटालाटीत काही जण खाली रोडावरच पडले. हा गोंधळ पाहून अनेकांनी तिथून काढता पाय घेतला. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी चार जणांवर सिडको पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतरांचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT