Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : नामांकित कंपनीच्या नावे अँप, वेबसाईटद्वारे गंडविले; उद्योजकाची ७३ लाखात फसवणूक

Sambhajinagar News : उद्योजकाने गुंतवणुकीसाठी टाकलेल्या रक्कमेपैकी निम्मे रक्कम बीडच्या बँक खात्यात गेल्याने राज्यातही सायबर गुन्हेगारांचे जाळे होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : फसवणुकीचा वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. अशाच प्रकारे गुंतवणुकीसाठी नावाजलेल्या कंपनीच्या नावे बनावट अँप आणि वेबसाईट तयार करून रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत छत्रपती संभाजीनगरमधील एका उद्योजकाचे 73 लाख लुटल्याचे समोर आलंय. पैसे पाठवल्यानंतर उद्योजकाने नावाजलेल्या कंपनीची मूळ वेबसाइट उघडून पाहिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

सायबर गुन्ह्यात दिल्ली, नोएडा, उत्तरप्रदेश, राजस्थान भागातील टोळ्या सहभागी असतात. मात्र, आता राज्यातही अनेक साायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे संभाजीनगरमध्ये घडलेल्या प्रकारातून समोर आले आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ५७ वर्षीय उद्योजकाची स्वतःची कंपनी आहे. दरम्यान ८ जुलैला त्यांना व्हॉट्सऍपला एका अज्ञात क्रमांकावरून प्रेमजी एक्स कंपनीत गुंतवणुकीबाबत विचारणा करण्यात आली. 

याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र ११ सप्टेंबरला त्यांना पुन्हा एका अज्ञात क्रमांकावरून कॉल प्राप्त झाला. तन्वी देशपांडे नामक तरुणीने कंपनीची माहिती दिली. यासाठी एक लिंक पाठवून १०६ प्रेमजी इन्व्हेस्टमेंट नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर त्यांना प्रेमजी इन्व्हेस्ट नावाचे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार उद्योजकाने देखील ऍप इंस्टॉल केले. उद्योजकाने आधी ३० व नंतर ४३ लाख पाठवून दिले.

रक्कम बीडच्या बँक खात्यात 

मात्र त्यांनी मूळ कंपनीकडून कंपनीची कुठली चौकशी केली नव्हती. त्यामुळे त्याची मोठी फसवणूक झाली. याच दरम्यान संबंधित उद्योजकाने वेबसाईट ओपन करून पाहण्याचं प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत 73 लाख रुपये खात्यातून ट्रान्स्फर झाले होते. धक्कादायक म्हणजे यातील अर्धेअधिक पैसे बीडच्या बँक खात्यात गेल्याने राज्यातही सायबर गुन्हेगारांचे जाळे होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : संभाजीनगरात भयंकर अपघात, बापाच्या डोळ्यासमोर दोन्ही लेकरांचा मृत्यू, मुलीला पाहून धाय मोकलून रडले

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Lonavala Mega Block: मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील १० दिवस मेगा ब्लॉक; VIDEO

Ayurvedic Kadha Recipe : हिवाळ्यात सर्दी - खोकल्यापासून राहाल दूर, रोज प्या 'हा' आयुर्वेदिक काढा

Gratuity Calculation: पगार ₹५०,०००... तर १, २, ३ आणि ४ वर्षानंतर किती ग्रॅच्युटी मिळणार? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

SCROLL FOR NEXT