Primary School Time
Primary School Time Saam tv
महाराष्ट्र

Primary School Time : चौथीपर्यंतच्या शाळा आता ९ वाजेनंतर भरणार; शिक्षण विभागाने काढले आदेश

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागत असते. पहिलीच्या वर्गापासूनच सकाळी ७ किंवा ८ वाजता शाळा भरविली जात असते. मात्र शिक्षण विभागाने आदेश काढत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेनंतर भरविण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे लहान मुलांची झोपमोड आता थांबणार आहे.

राज्यातील बहुतेक शाळा (School) या सकाळी ७ किंवा ८ वाजता भरविण्यात येत असतात. त्यामुळे शाळेच्या वेळेच्या आधी लहान मुलांना किमान १ ते २ तास आधी तयारी करावी लागते. परिणामी लहान मुलांना सकाळी ६ वाजेपूर्वी उठावे लागत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. काही महिन्यांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी देखील  हा मुद्दा उपस्थित करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाला (Education Department) केल्या होत्या.  

आता शाळेच्या वेळेबाबत शिक्षण विभागाने निर्णय घेत छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंत शाळा सकाळी नऊ वाजेपर्यंत भरविण्याबाबतचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची झोपमोड आता थांबणार असून त्यांना दिलासा मिळाला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Exam: केंद्र सरकार रिटेस्ट घेण्यास इच्छुक नाही, सिद्धार्थ शिंदे महत्त्वाचं बोलले...

Anant- Radhika Wedding News : राधिका- अनंत अंबानी यांच्या लग्नात सजणार सुरांची मैफल, बॉलिवूडचे दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स

Worli Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना झटका; राजेश शहा यांना जामीन मंजूर

Mumbai Rain Video: मुंबईत ३०० मिलीमीटर एवढा पाऊस, सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Jui Gadkari: जुईगडकरीचं सौंदर्य पाहून मन झालं घायाळ

SCROLL FOR NEXT