Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : सात लाख पाहून नियती फिरली; मालकापर्यंत न पोहचत झाला गायब

सात लाख पाहून नियती फिरली; मालकापर्यंत न पोहचत झाला गायब

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : चार वर्षांपासून उद्योजकाकडे चालक म्हणून कामाला असलेल्या एकाने त्यांचे सात लाख रुपये घेऊन पोबारा केला. मात्र गुन्हे शाखा पोलिसांनी (Police) त्याला अवघ्या चार दिवसात शोधून आणून त्याच्याकडून सर्व सात लाख रुपये जप्त केले आहेत. (Breaking Marathi News)

नामदेव जाधव असे आरोपीचे नाव आहे. शेंद्रा (sambhajinagar) एमआयडीसी प्रीतम खिंवसरा यांची कंपनी आहे. १४ जुलैला त्यांचा मुलगा कंपनीत गेला. तेव्हा त्यांना पैशाची आवश्यकता पडल्याने त्यांनी आई प्रीतम यांना फोन करून सात लाख रुपये मागितले. प्रीतम यांनी चालक नामदेव जाधवकडे सात लाख रुपये दिले आणि कंपनीत जाऊन मुलाकडे देण्यास सांगितले. त्‍यानुसार चालक पैशांचा बॅग घेऊन निघाला, मात्र पैसे पोहचलेच नाही.

चालकाची नियती फिरली अन्‌

सात लाख रूपये पाहिल्‍यानंतर चालक नामदेव जाधव याची नियत फिरली. त्याने ही रक्कम कंपनीत नेऊन देण्याऐवजी पैसे हाती पडल्यावर मोबाईल बंद करून पोबारा केला होता. या प्रकरणी अखेर १६ जुलैला एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी चार दिवसात आरोपीला ताब्‍यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT