Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Ghati Hospital : घाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड, आयकार्डही बंधनकारक; ड्रेस नसल्यास नो एन्ट्री

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात एक्स रे विभागातील तरुणीचा विनयभंग आणि वार्डातील कर्मचाऱ्यांनी परस्पर बदली कर्मचारी कामावर ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आता ड्रेस कोड व आयकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कर्मचारी ड्रेस कोडमध्ये नसल्यास त्याला रुग्णालयात नो एंट्री राहणार असल्याचे नियम रुग्णालय प्रशासनाने लावले आहेत. 

छत्रपती संभाजीनगरच्या (sambhajinagar) घाटी रुग्णालयात एक्स रे विभागातील तरुणीचा विनयभंग आणि वार्डातील कर्मचाऱ्यांनी परस्पर बदली कर्मचारी कामावर ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) बाहेरचे कर्मचारी कामावर ठेवले जात असल्याची बातमी 'साम टीव्ही'ने दाखवली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि तात्काळ हा निर्णय घेतला आहे. तसेच याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. 

तर विभाग प्रमुख जबाबदार 

घाटी रुग्णालयात समोर आलेल्या या दोन प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने आता कठोर पावल उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता घाटी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय एन्ट्री नसेल. शिवाय आयडी कार्ड देखील असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळं रुग्णांशी गैरवर्तनाचा किंवा विनयभंगाचा प्रकार घडल्यास वार्ड प्रमुख आणि विभाग प्रमुख सर्वस्वी जबाबदार राहतील; असा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

Maharashtra News Live Update: अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

SCROLL FOR NEXT