Ghati Hospital Saam tv
महाराष्ट्र

Ghati Hospital : औषधी साठा असूनही डॉक्टरांकडून लिहून दिली जाते चिठ्ठी; घाटी रुग्णालयातील त्या डॉक्टरांवर होणार कारवाई

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात सुमारे ९५ टक्के औषधी साठा उपलब्ध होऊनही अनेक रुग्णांना चिठ्ठी लिहून देण्याचे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. यामुळे अधिष्ठाता आता ॲक्शन मोडवर आले असून औषधी लिहून देणाऱ्या चिट्ठीसह डॉक्टरांचा फोटो घेऊन येण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. 

जिल्हा रुग्णालयात बऱ्याचदा रुग्णांना चिठ्ठी लिहून बाहेरून औषधी आणण्यास सांगितली जात असते. असाच प्रकार संभाजीनगरच्या (Ghati Hospital) घाटी रुग्णालयात देखील सुरु आहे. विशेष म्हणजे औषधी साठा पुरेसा असताना देखील तेथील डॉक्टरांकडून चिठ्ठी लिहून देण्याचे प्रकार सुरु आहेत. अर्थात बाहेरील मेडिकल वाल्यांशी डॉक्टरांचे लागेबांधे असण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. अशा (Doctor) डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी अधिष्ठाता ऍक्शन मोडवर आहेत. 

या निवासी डॉक्टरने चिठ्ठी लिहून दिली त्याच्यासह विभागाचा इन्चार्ज यांच्यावर थेट बदलीची कारवाई केली जाईल असा (sambhajinagar) इशारा घाठीच्या अधिष्ठातांनी दिला. त्याबरोबरच खासगी मेडिकलवाल्यांशी घाटीतील कुणाचे छुपे लागेबांधे आहेत का? याचीही सखोल चौकशी आता होणार आहे. घाटी रुग्णालयात सर्व प्रकारची औषधी ९५ टक्के उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यासाठी सांगणाऱ्या डॉक्टरवर आता घाटी प्रशासन कारवाई करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 1500 रुपयांच्या नावाने महिलांना धमकावलं जातं; वडेट्टीवारांचा घणाघात

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT