Cough Syrup Saam tv
महाराष्ट्र

Cough Syrup : नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरपचा साठा जप्त; आंतरराज्य टोळीतील दोघे जेरबंद

Sambhajinagar News : बंदी घालण्यात आलेल्या कफ सिरपची विक्री होत असल्याचा प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. यानंतर संभाजीनगरमध्ये नशेसाठी वापरला जाणारा साठा जप्तीची कारवाई करण्यात आली

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यानंतर यावर बंदी घालण्यात आली आहे. यातच छत्रपती संभाजीनगर शहरात नशेसाठी वापरला जाणारा लाखो रुपयांचा कफ सिरपचा साठा पोलिसांनी जप्त केला. या सोबतच कफ सिरप बाजारात पोहचवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. 

देशभर कफ सिरप वरून खळबळ उडल्यानंतर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. प्रामुख्याने मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये २१ मुलांचा कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून काही कफ सिरप वापर व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. असे असताना देखील बंदी घालण्यात आलेल्या कफ सिरपची विक्री होत असल्याचा प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. यानंतर संभाजीनगरमध्ये नशेसाठी वापरला जाणारा साठा जप्तीची कारवाई करण्यात आली. 

७७ लाख ४४ हजाराचा साठा जप्त 

छत्रपती संभाजीनगरमधे नशा करण्यासाठी कफ सिरप पुरवठा करणारे आंतर राज्यीय रॅकेट पोलिसांनी समोर आणले आहे. या टोळीकडून ७७ लाख ४४ हजार रुपये किमतीच्या १८ हजार ३६० कफ सिरप बॉटलचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसाच्या क्राईम ब्रँचने ही कारवाई केली आहे. 

देशभरात मोठे रॅकेट असण्याची शक्यता 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये मध्य प्रदेश आणि गुजरातच्या अहमदाबाद येथील दोन आरोपींचा समावेश आहे. दुर्गेश रावत, धर्मेंद्र प्रजापती, कल्पेश अग्रवाल, सय्यद नबी यांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखीही आरोपी असून त्याचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. यामागे देशभरातले मोठ रॅकेट महाराष्ट्राशी कनेक्टेड असू शकते; असा पोलिसांना अंदाज आहे. त्याच दृष्टीने सध्या तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर काळेपडळ पोलिसांचा छापा

CBSE 10th Result 2026 Declared : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या माहिती

Solkadhi Benefits: उन्हाळ्यात थंडगार सोलकढी पिण्याचे हे आहेत 5 आश्चर्यकारक फायदे

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope: पुढील १५ दिवसात नशीब पालटणार! जीवनात असतील रिस्क आणि ट्विस्ट, कोणत्या राशी ठरतील भाग्यवान अन् कोणाला होईल नुकसान?

SCROLL FOR NEXT