Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar : पाण्याच्या प्रवाहात नदीत मधोमध अडकली कार; भाविकांचा जीव टांगणीला, सुखरूप बाहेर काढण्यात यश

Sambhajinagar News : पावसाचा जोर वाढला असल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशात देखील पुराच्या पाण्यातून वाहन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न अंगाशी येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशात रुद्रेश्वर येथे श्रावण सोमवार निमित्ताने दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार नदीच्या पुराच्या पाण्यात अडकली होती. यामुळे भाविकांचा जीव मुठीत अडकला होता. मात्र या साठी भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव जवळील वेताळवाडीतील ग्रामस्थांनी नदीत उतरून नदीच्या पुरातील सात पर्यटकांना बाहेर काढले. रुद्रेश्वर येथे पर्यट आणि श्रावण सोमवारनिमित्त आलेल्या सिल्लोड तालुक्यातील सात पर्यटक वाहनासह वेताळवाडी नदीच्या पुरात अडकले होते. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान घडली. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील सात प्रवासी वाहनाने रुद्रेश्वरला आले होते. 

अचानक पाण्याचा प्रवाह वाढला 

दरम्यान दुपारी रुद्रेश्वर लेणी पाहून ते घरी परतताना वेताळवाडी नदीला पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात चालकाने वाहन घातले. मात्र नदीच्या मधोमध गाडी गेल्यानंतर कार बंद पडल्याने नदीत अडकली होती. यावेळी पुराचा प्रवाह कमी होता. परंतु, वाहन नदीपात्रात मध्यभागी असताना अचानक पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढला. यावेळी चालकासह प्रवासी गांगरले होते. हा प्रकार नदीजवळ असलेले वेताळवाडीचे पोलिस पाटील श्रीराम जाधव यांच्या लक्षात आला. 

तरुणांनी पाण्यात उड्या मारत काढले बाहेर 

पोलीस पाटील जाधव यांनी गावात माहिती दिल्यानंतर त्यांच्यासह गावातील इसाक शहा, आयुब शहा, आरिफ खान, माजित खाँ मेवाती, गुफरान पठाण, कालू हुसेन मेवती यांच्यासह दहा ते बारा पोहणाऱ्या तरुणांनी पुराच्या पाण्यात उड्या टाकल्या. नागरिकांनी वाहन पाण्यातून ढकलत नदीच्या काठावर आणले. त्यातील तीन पुरुष व चार महिलांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने ट्रॅक्टर मालक सत्तार खान मेवाती यांनी पुरातील अडकलेले वाहन पाण्याच्या बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

Horrific Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार; सरस्वती पूजन करून परतताना विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT