Ambadas Danve Sandipan Bhumare Saam tv
महाराष्ट्र

Ambadas Danve News: भुमरेंची एकच व्याख्या, सगळं आपल्यालाच मिळावं; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे या मतदार संघातले आहे का? त्यामुळे त्यांनी कितीही दंड थोपटले तरी त्यांचा या मतदार संघाशी काहीही संबंध येणार नाही. मुळात मागील ३०-४० वर्षापासून संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांची एकच व्याख्या आहे, की सगळं आपल्यालाच मिळावं. आपल्या भावाला मिळावं आणि मुलालाही मिळावं; असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संदिपान भुमरेवर केला आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आगामी होणाऱ्या निवडणुकीवरून चर्चेची रणधुमाळी सुरू असताना इच्छुक असणाऱ्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या सुरू आहे. दरम्यान पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या टीकेला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


खैरेसोबत कुठलाही वाद नाही 
चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कुठलाही वाद नसून ते माझे नेतेच आहे. शिवसैनिक हे आक्रमकपणे भांडतही असतात आणि वेळ पडली की पुन्हा एकत्र येत असतात. संघटनेमध्ये काम करत असताना अश्या चर्चा होतच असतात. या चर्चेतूनच पुढचा मार्ग निघत असतो.  त्यामुळे माझ्याही मनात काही शंका नसून खैरे यांच्याही मनात काही शंका नाही; असं बोलून त्यांनी या राजकीय वर्तुळात उलट सुलट होणाऱ्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम दिला. 

गिरीश महाजनांना टोला
राम मंदिराच्या उदघाटनाची न दिलेल्या आमंत्रणबाबत गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना दानवे यांनी गिरीश महाजन हे सुद्धा काही मोठे व्हीआयपी नेते नाहीत. त्यामुळे महाजन यांच्यावर अधिकच बोलणं मि टाळेल; असे सांगितले.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT