144 Small Medium Projects Dry in Sambhajinagar's Marathwada As Ground Water Storage is Low Saam TV
महाराष्ट्र

Marathwada Water Grid Project: मराठवाड्यात १४४ लघु मध्यम प्रकल्प कोरडे; भूजल साठा घटल्याने पाणी टंचाईची भीषण स्थिती

Sambhajinagar News: Water Scarcity in Marathwada | कमी पाऊस झाल्याने पाण्याची समस्या अधिक गडद झाली आहे. धरण, तलावात देखील पाणी कमी साचल्याने आता उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होऊन असलेला पाणी साठा देखील घटत आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाणी साठा घटत चालला आहे. तर काही ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होताना दिसत आहे. मराठवाड्यातील एकूण ८२४ लघुउद्योग प्रकल्प पैकी जवळपास १४४ प्रकल्प आता कोरडे पडले आहेत. यामुळे पाणी टंचाईची भीषणता अधिक जाणवत आहे.

कमी पाऊस (Rain) झाल्याने पाण्याची समस्या अधिक गडद झाली आहे. धरण, तलावात देखील पाणी कमी साचल्याने (sambhajinagar) आता उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होऊन असलेला पाणी साठा देखील घटत आहे. आता यंदाच्या मान्सून लांबल्यास ही भीषणता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली असून सद्यस्थितीला मराठवाड्यातील तब्बल १४४ प्रकल्प कोरडे पडल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

आटत चाललेला पाणीसाठा आणि घटता भूजल साठा यामुळे सद्यस्थितीला मराठवाड्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती पाहायला मिळत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान (Jayakwadi dam) जायकवाडी धरणात पाणीसाठा हा केवळ सात टक्केच असल्याने पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण होत चालली आहे. यामुळे काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

Shocking News : मुलीच्या शाळेची फी आणि TC मागायला गेले, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण; वडिलांचा जागीच मृत्यू

Monsoon Skin Tips: पावसाळ्यात तेलकट त्वचेची समस्या? जाणून घ्या घरच्या घरी वापरता येणारे प्रभावी उपाय

SCROLL FOR NEXT