Sambhajinagar Rain Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Rain : बारा दिवसात १४ जणांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीज कोसळल्याच्या घटना

Sambhajinagar news : मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणातील पाणीसाठ्यात सरासरी एका टक्क्याने वाढ झाली आहे. लहान आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : यंदा उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे सगळेच होरपळले गेले. मात्र मराठवाड्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस झाल्याने दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असताना दुसरीकडे याकाळात मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात १४ जणांचे मृत्यू झाला आहे. 

गेल्या दोन दिवसांत होत असलेल्या पावसामुळे धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. (Marathwada) मराठवड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा ३ दिवसांपूर्वी चार टक्क्यांवर आला होता. आता त्यात दिड ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या जायकवाडी धरणात ५.६५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तर मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणातील पाणीसाठ्यात सरासरी एका टक्क्याने वाढ झाली आहे. लहान आणि मध्यम प्रकल्पातील (Sambhajinagar) पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे हळूहळू टँकरच्या संख्येतही घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. 

मात्र जून महिना सुरु झाल्यानंतर सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मॉन्सूनचा (Rain) पाऊस जोरदार बरसला. जून महिन्याच्या १२ दिवसांत वीज पडून १२ जणांचा तर वाहून जाऊन एकाचा व वादळी वाऱ्यामुळे गोठा अंगावर पडून एक असा १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. त्यासोबत २५१ लहान मोठ्या जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT